,

!! चक्क रेड्याची धार !!

चित्र संकल्पनात्मक आहे; ते प्रत्यक्ष घटनेचा पुरावा नाही.

Modern dairy facility with cows, milk silo, orange milk-drop logo, and branded milk bottles displayed at the entrance

                   होय काल कोल्हापुरात गोकुळ दूध संघासंदर्भात घडलेल्या घटनेची संभावना रेड्याची धार अशीच करावी लागेल, हे आरसपानी कर्तुत्व आहे शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी असलेल्या राज्यातल्या भाजपप्रणित महायुतीचं. सत्ताधाऱ्यांनी चक्क रेड्याला दूध द्यायला भाग पाडलं.
                   साधारण वर्षाला ४००० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या सहकारातील गोकुळ दूध संघाची निवडणूक ऑक्टोबर मध्ये पार पडली, जनमताचा कौल श्री सतेज पाटलांच्या नेतृत्वात लढलेल्या समविचारी आघाडीला मिळाला, त्यांचे १३ संचालक निवडून आले. अध्यक्ष निवडीबाबत कोरमचा मुद्दा पुढे आला त्यासाठी त्यांना एक संचालक कमी पडला, याच तांत्रिक मुद्द्याच्या आधारे राज्यातील सत्ताधारी महायुतीने सहकारी गोकुळ दूध संघावर अतिप्रसंग करत रेडा फळाला घातला व अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा घाट घातला. ताबडतोबिनं कॅबिनेट घेऊन ४ शासननियुक्त संचालक गोकुळवर नेमण्याचा अध्यादेश काढला इथपर्यंत न थांबता अध्यक्ष निवडीतही त्यांना मतदानाचा हक्क बहाल केला.
                  ९ नोव्हेंबरला श्री बंटी पाटलांनी सरकारच्या या कृतीविरोधात कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढला त्याच दिवशी संभाजीनगर खंडपीठानं महायुतीला दिलासा देत शासननियुक्त संचालकांचे अध्यक्ष निवडीत मतदानाचे अधिकार ग्राह्य धरले त्यावर प्रतिक्रिया देतना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीला परमेश्वराची साथ असल्याचं बोलून दाखवलं. काम करणाऱ्या, चांगली नियत ठेवणाऱ्या व नीतिमत्तेने वागणाऱ्यांच्या पाठीशी परमेश्वर असल्याचं सांगितलं परंतु ९ तारखेला कोल्हापुरात संघर्ष मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर उतरलेला जनसैलाबच खरं परमेश्वराचं विशाल रूप होतं. तिथं अनेकांच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर ऐकायला, बघायला मिळाल्या, त्याचठिकाणी मुश्रीफांच्या नेतृत्वात लढलेल्या शेतकरी विकास आघाडीच्या ठरावधारकाने / मतदाराने उपस्थिती नोंदवली त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती "आम्ही महायुतीला मतदान करून चूक केली, झक मारली" त्यामुळेच ही अभूतपूर्व परिस्थिती ओढवली अशा शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.
                    कोरमअभावी सलग ३ वेळा सहकारात सभा तहकूब झालीतर संस्थेचा कारभार प्रशासक चालवणार त्यानंतर नव्याने निवडणूक होणार, तेव्हा मात्र गोकुळचे मतदार आपली खेटरानं पूजा करतील याची पुरेपूर जाणीव झाल्याने महायुतीने सत्ता बदलण्याचा घाट घातला. हे काय पॉलिसी डिसिजन नाही तर एका संस्थेला टार्गेट करणारी कृती असल्यानं ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं तज्ञ लोक सांगतात भविष्यात या घटनेचा सुप्रीमकोर्टापर्यंत गुळ काढला जाईल असो.
                   आता गोकुळचा हा विषय कोल्हापूरपुरता मर्यादित नराहता तो राज्याच्या, देशाचा विषय बनला आहे. "अब याचना नही रण होगा, ऐसा होगा फिर कभी नही जैसा होगा". ही फक्त श्री बंटी पाटलांची भावना नाही तर ती जनमानसाचीसुद्धा झाली आहे. चंद्रकांत पाटलांचा व्यक्तीद्वेष तर लोकशाहीला बटीक बनवणारा आहे. त्यामुळे गोकुळ हे महायुतीच्या शेवटाची सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
✍️ कल्याण पिसाळ देशमुख. ओझर्डे
फोन - ९८५०४१२९०९.

Previous:

Comments

Leave a Reply