!! चॉईस ज्ञानियांचा !!

चित्र संकल्पनात्मक आहे; ते प्रत्यक्ष घटनेचा पुरावा नाही.

Election poster in Marathi for Pune teachers and graduates constituency 2026, featuring candidates Harshda Deshmukh Jadhav and Prof. Jayant Aagavkar under the Mahavikas Aghadi alliance.
  • *!! चॉईस ज्ञानियांचा !!**

            शिक्षक व पदवीधर निवडणूक.
             विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक पार पडते आहे.साधारणपणे कुठल्याही निवडणूकीत सुशिक्षित मतदार मतदान प्रक्रियेपासून कोसो लांब राहतो, त्या दिवशीच्या सुट्टीचा उपभोग घेण्यात दंग असतो. ज्या लोकांनी खरंच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करायला पाहिजे तिथंच कमालीचा निरुत्साह पाहायला मिळतो. त्यात पुणे विभाग मतदारसंघ म्हणजे ५ जिल्हे व ५८ विधानसभा मतदारसंघाचं कार्यक्षेत्र त्यात विखुरलेले मतदार, त्याला शोधणे, त्यापर्यंत पोहोचणे, मतदाराला मतदान केंद्रापर्यंत यायला प्रवृत्त करणे हे प्रचंड मोठं दिव्य. स्वतः उमेदवारांना सर्व ठिकाणी पोहचणं कठीण काम त्यातच मतदारसंघातील बहुतेक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूका सुरू आहेत त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील मोठे मोठे राजकीय संत - महंत बँकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत त्यामुळे सगळी मदार कार्यकर्त्यांच्यावर आहे. ही एकमेव अशी निवडणूक आहे की या निवडणूकीसंदर्भातील मतदार याद्याना अंतिम स्वरूप यायच्या आतच निवडणूक जाहीर झालेली आहे. वरवर ही निवडणूक सुशिक्षितांची वाटत असली तरी ती राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत इच्छुकांची मांदियाळी फार होती परंतु १० ऑक्टोबरला इच्छुकांच्या माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ही निवडणूक सरळ सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे महायुतीतील भारतीय जनता पक्षाने साम-दाम-दंड-भेद, राजकीय तंत्र मंत्र सर्व आयुधांचा वापर करून सहकारी पक्षांना डालून राजकीय दृष्ट्या सर्वव्यापी होण्याचा चंग बांधला आहे. पदवीधर मतदारसंघातील सीट सहकारी पक्षाच्या वाट्याची परंतु ती स्वतःकडे ठेवत अलीकडच्या काळातील निवडणुकासंदर्भातील भाजपची मोडसऑपरेंटी अगदी स्पष्ट केली आहे. खरेदीतंत्रावर त्यांचा खास भरोसा आहे.नेता, कार्यकर्ता, मतदार कुणीही असो एकदा त्याची किंमत ठरवली, ओटीभरण झाले की काम फत्ते परंतु इथं ईव्हीएमचं हुकमी शस्त्र त्यांच्या भात्यात असणार नाही, ही निवडणूक बॅलेट पेपरवर पार पडणारी आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार पदवीधर किंवा शिक्षक आहेत खऱ्या अर्थाने ही निवडणूक २०१९ ची लिटमस टेस्टच ठरणार आहे.
            घरात पदवीधर असणाऱ्या पुणे मतदारसंघात फक्त ३ ते ३. ५ लाखांच्या आसपास प्रत्यक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदार संघातील सीट ही महायुतीतील भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे ठेवत अनपेक्षितरित्या अराजकीय मानल्या जाणाऱ्या डॉ.स्मिता जाधव यांना उमेदवारी देऊन पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याला धर्मसंकटाच्या बेड्यात अडकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बंटी उर्फ सतेज पाटील यांनी ही निवडणूक जास्त गांभीर्याने घेतलेली दिसते, कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाची दंगल चालू असतानाही ते महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या विजयासाठी हिरीरीने प्रयत्न करताना सर्वांच्या पुढे दिसतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सौ हर्षदा देशमुख जाधव यांना उमेदवारी देऊन राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवाचा समतोल साधलेला आहे. तरुणांच्या व सुशिक्षितांच्या प्रश्नांचं सखोल ज्ञान, तरुणांचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास ह्या यांच्या जमेच्या बाजू आहेत एकंदरीत सौ हर्षदा देशमुख जाधव याचं एक उमेदवार म्हणून महायुतीसमोर तगडं आव्हान आहे, एका अर्थाने त्यांचे पारडं जड आहे त्यांच्याच विजयाची शक्यता पदवीधरांकडून बोलून दाखवली जाते.
           शिक्षण मतदारसंघात काँग्रेस पक्षाने श्री जयंत आजगावकर यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे, साधारण ६८ हजार मतदारांचा मतदारसंघ. मागील सहा वर्षातील त्यांच्या कामाचा बोलबला अधिक आहे, कंत्राटी शिक्षक भरतीच्या लढ्याचं यश, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित ते अनुदानित अश्या अनेक कामांची जंत्री मोठी आहे त्यामुळे कामाच्या जोरावर त्यांचा विजय विनासायास असल्याची सर्वसाधारण शिक्षक मतदारांची भावना आहे. एकंदरीत शिक्षण क्षेत्राविषयी केंद्र व राज्य सरकारचं धोरण आपणास ज्ञात आहेच.हजारोंच्या संख्येने बंद होणाऱ्या शाळा, शिक्षक कर्मचाऱ्यांच्याप्रति असणारी सरकारी अनास्था फार बोलकी आहे.
           निवडणुकीत सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था, कोल्हापूरची स्वामी शिक्षण संस्था, डी वाय पाटील, भारती विद्यापीठ त्याचबरोबर छोट्या-मोठ्या संस्थेतील मतदार प्रमुखांचे ऐकणार ही स्वतःच्या बुद्धीने मतदान करणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. सध्या देशात विविध प्रश्नांना घेऊन विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी, कॉकरोच जनता पार्टी आंदोलन व सहकारी पक्षांनी सतत सरकारविरोधात वातावरण चांगलंच तापवलं आहे त्यांना मिळणारा जेन - झीचा प्रतिसाद, मुंबई व पुणे येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील तसेच महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचं नागवंपण जनतेसमोर येत आहे. मोदी, फडणवीस सरकारच्या विरोधातला रोष पदवीधर व शिक्षक निवडणूकीत स्पष्टपणे दिसतो आहे, त्यायोगे श्री जयंत आजगावकर व सौ हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय निश्चित मानला जातोय ही गोष्ट खरी आहे.
✍️ कल्याण पिसाळ देशमुख - ओझर्डे.
फोन - ९८५०४१२९०९.

Next:

Comments

Leave a Reply